सावंतवाडी:
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची हर घर तिरंगा यात्रा न भुतो न भविष्यती अशी होईल. जिल्हा संयोजक संदिप गावडे आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे हर घर तिरंगा यात्रा अभियान २०२६ संघटनात्मक बैठक या अभियानाचे संयोजक संदीपजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब.*
सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष अनीलजी निरवडेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीपजी गिरप महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडली. सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी ही भव्य तिरंगा यात्रा होणार असून सावंतवाडी येथील श्री देव उपरलकर येथून सकाळी ठीक दहा वाजता या यात्रेला शुभारंभ होणार असून त्याबाबत आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. या यात्रेत सुमारे पाच ते सहा हजार लोकांचा सहभाग असणार आहे. हा देशप्रेम, देशभक्तीचा सोहळ्यात हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले.
हर घर तिरंगा यात्रा २०२६ जिल्हा संयोजक संदिप गावडे, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दोडामार्ग माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, दोडामार्ग मंडल अध्यक्ष दिपक गवस, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष विष्णू परब, सावंतवाडी मंडल महिला अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, सावंतवाडी मंडल युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, सावंतवाडी मंडल संयोजक सौ. दिपाली भालेकर, सहसंयोजक प्रतिक बांदेकर, सौ. सुकन्या टोपले, बांदा मंडल संयोजक सिद्धेश महाजन, सहसंयोजक अष्टविनायक धाऊसकर, वेंगुर्ला मंडल सहसंयोजक सचिन शेट्ये, दोडामार्ग मंडल सहसंयोजक अंकुश नाईक, सुनील गवस, आंबोली मंडल संयोजक विनेश तावडे, सहसंयोजक दादा परब, सागर ढोकरे, सावंतवाडी नगरसेविका सौ. सुनीता पेडणेकर, सौ. दुलारी रांगणेकर, सौ. निलम नाईक, वेंगुर्ला नगरसेवक विनय नेरुरकर, नगरसेविका सौ. गौरी माईणकर, सौ. गौरी मराठे, अनुसुचीत जाती मोर्चा उपाध्यक्ष पुंडलीक कदम, अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष ड्युमिंग आल्मेडा, सावंतवाडी मंडल सरचिटणीस संतोष तळवणेकर, चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, शिवा गावडे, केदार म्हसकर आदी उपस्थित होते.
