माजी विद्यार्थी तथा उद्योगपती जी. के.सावंत यांच्याकडून माणगाव हायस्कूलला एक लाखांचा इन्व्हर्टर भेट

माणगाव प्रतिनिधी:
श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव या प्रशालेस शाळेचे माजी विद्यार्थी तथा उद्योगपती मा. श्री. जी. के. सावंत यांच्या सौजन्याने रु. १ लाख किमतीचा इन्व्हर्टर भेट स्वरूपात देण्यात आला. दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी ही मोलाची भेट प्रशालेला प्रदान करण्यात आली.

शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजासाठी हा इन्व्हर्टर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत शाळेच्या गरजांसाठी केलेले हे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, सदर इन्व्हर्टर श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयास मिळवून देण्यासाठी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव मा. श्री. साईनाथ नार्वेकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे प्रशालेला ही मोलाची भेट प्राप्त झाली.

या सहकार्याबद्दल माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगाव, संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव यांच्या वतीने मा. श्री. जी. के. सावंत यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांचे असे सहकार्य आणि सद्भावना विद्यालयाच्या प्रगतीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top