इन्सुलीत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी:
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन सौ. वेदिकाताई परब यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार असून, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर प्रमुख वक्ते, तर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरवजी मुळीक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, इन्सुली सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष सचिन दळवी, सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोरगांवकर, मुळदे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, डॉ. रणजीत देव्हारे, सहाय्यक विस्तारतज्ज्ञ डॉ. गिरीष उईके, सहाय्यक प्राध्यापक डॉ. जया वाघ व डॉ. निलिमा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रानभाजी महोत्सवातील पाककला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक कुकर, द्वितीय क्रमांकासाठी विद्युत प्रवर्तन, तृतीय क्रमांकासाठी समई, चतुर्थ क्रमांकासाठी कुकर, तर पाचव्या क्रमांकासाठी इस्त्री अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच महोत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पौष्टिक मूल्य, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण भागातील स्थानिक संसाधनांचा योग्य वापर याबाबत जनजागृती होणार असून, नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top