दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी ५० बंधाऱ्यांचा संकल्प!
युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस ठरला निमित्त, शेतकऱ्यांच्या बांधावर थेट मदतीचा निर्धार
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे गतिमान करण्यासाठी ५० लहान-मोठे बंधारे उभारण्याच्या संकल्पाला आता प्रशासकीय सहकार्याची जोड मिळावी, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या पूर्तीनिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’च्या अनुषंगाने आणि भाजपचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रत्यक्ष मदत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाई कमी करणे, भूजल पातळी वाढविणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य वापर करणे, या उद्देशाने लोकसहभागातून सुमारे ५० लहान-मोठे बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा !
हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्य ठिकाणांची निवड, तांत्रिक मार्गदर्शन, आवश्यक परवानग्या, यंत्रसामग्री तसेच संबंधित शासकीय विभागांशी समन्वय यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
विशेष म्हणजे, जलसंधारणाच्या माध्यमातून गावागावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आणि शेतकऱ्यांच्या शेतीला आधार देण्याचा हा उपक्रम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘वाढदिवस’ समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्याचा निर्धार!
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा, सत्कार आणि औपचारिक कार्यक्रम न करता जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त हाती घेण्यात आलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील पाणीप्रश्नाला भिडणारा ठरणार आहे.
“शेतकऱ्यांच्या बांधावर मदतीचा हात आणि गावागावांत पाण्याचा साठा” या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
ळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे गतिमान करण्यासाठी ५० लहान-मोठे बंधारे उभारण्याच्या संकल्पाला आता प्रशासकीय सहकार्याची जोड मिळावी, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.