“स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया”- भाजप युवा नेते विशाल परब

तळवणेत खुली सोलो नृत्य व पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा उत्साहात संपन्न

सावंतवाडी:
आपल्या गावातील कलागुणांना व्यासपीठ देणारे उपक्रम सांस्कृतिक परंपरेला बळ देतात. नृत्यस्पर्धेतून कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेसारख्या उपक्रमांतून निसर्गसंवर्धनाचा संदेशही पुढे नेला पाहिजे,” असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री. विशाल प्रभाकर परब यांनी केले.

तळवणे थंडर क्रिकेट क्लब व नवयुवक नाट्य संपदा, तळवणे यांच्या वतीने आयोजित खुली सोलो नृत्य स्पर्धा २०२६ आणि तळवणे मर्यादित पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी श्री देव रवळनाथ मंदिर रंगमंच येथे श्री. विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.

या निमित्ताने परब यांनी आयोजकांच्या पुढाकाराचे कौतुक केले. स्थानिक कलाकारांच्या कला आणि सर्जनशीलतेला संधी देणारे उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पूज्य मठाधीश राजेंद्र भारती महाराज, जिल्हा परिषद सदस्य सुधन कवठणकर, तळवणे सरपंच समीर केरकर, गुळदुवे सरपंच शैलेंद्र जोशी, गुळदुवे उपसरपंच गणपत शेटकर, भाजप युवा तालुका अध्यक्ष सिद्धेश कांबळी, भाजप सरचिटणीस नारायण कांबळी, तळवणे माजी उपसरपंच रंजन गावडे, रवींद्र गावडे, सावळाराम घाटये, सुधीर गावडे, सुहास गावडे, काका गावडे, बाबू गावडे, आबा शेटकर, रंजन गावडे आणि नाना गावडे यांच्यासह अन्य मान्यवर, आयोजक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top