सावंतवाडी:
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून प्रलंबित विकासकामे व विविध समस्यांबाबतची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत.प्रलंबित कामांबाबतची निवेदने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नावाने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही निवेदने महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजपा कोकण विभाग संयोजक तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रमोद जठार आणि संतोष साखरे स्वीकारणार आहेत.हे सेवा अभियान सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै व्यासपीठ येथे होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांबाबतची निवेदने घेऊन या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
